गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
अ.क्र. गांडूळखत शेणखत / कंपोस्ट खत
१ गांडूळखत लवकर तयार होते (गांडूळे गादीवाफयावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे) मंदगतीने तयार होते (जवळ जवळ ४ महिने लागतात)
२ घाण वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक नाही घाण वास, माशा, डास यांपासून उपद्रव संभवतो
३ जागा कमी लागते जागा जास्त लागते
४ ४ x १ x ७५ फूटआकाराच्या गादीवाफया पासून ( म्हणजेच ३०० घनफूट ) दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते ३ x १० x १० फूट आकाराच्याखड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते.
५ उर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
६ हेक्टरी मात्रा ५ टन लागते हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते
७ तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते. तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
८ नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के नत्र उपलब ०.५ ते १.५ टक्के
९ स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९टक्के
१० पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
११ सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्धहोतात सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात
१२ गांडूळे विक्री करुन अतिरिक्त उत्पन्न मिळते कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.
गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग
अ) माती च्या दृष्टिने
१. गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
२. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
३. गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
४. गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
५. जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते
६. जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
७. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
८. जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
९. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
१०. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
११. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
ब) शेतक-यांच्या दृष्टीने फायदे
१. इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
२. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
३. पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
४. झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त वचांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
५. रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
६. मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
७. गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने
१. माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते.
२. जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
३. पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
४. रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
५. कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
ड) इतर उपयोग
१. गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
२. पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
३. आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
४. पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो.
५. परदेशात पिझाज, आमलेट, सॅलेड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.
६. गांडूळांच्या कोरडया पावडरमध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो.
गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
१. एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
२. बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
३. संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
४. गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
५. गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
१. शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष,सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
२. स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखतसमप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
३. हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
४. गोरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजीः
१. गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीट कनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
२. गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.
३. गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
४. योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
गांडूळांचा वापर करुन सेंद्रीय खत निर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करुन सन १९९३-९४ पासून कृषि विभागामार्फत तालुका बीज गुणन प्रक्षेत्रावर गांडूळ खत/ कल्चर उत्पादन कार्यक्रमकार्यान्वित केला आहे. आतापर्यंत १७९ तालुका बीज गुणन केंद्रावर हा कार्यक्रम सुरु असून तालुक्यातील शेतक-यांना लगतच्या प्रक्षेत्रावर गांडूळ खत/कल्चर उपलबध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रक्षेत्रावर उत्पादीत केलेले गांडूळ कल्चर रुपये ४००/- प्रतीहजार व गांडूळ खत रुपये २०००/- प्रती टन या दराप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तसेचकृषि चिकित्सालयामार्फत गांडूळ खत उत्पादनाचे प्रशिक्षण / प्रात्यक्षिक शेतक-यांना देण्यात येते
गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
अ.क्र.
गांडूळखत
शेणखत / कंपोस्ट खत
१
गांडूळखत लवकर तयार होते (गांडूळे गादीवाफयावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे)
मंदगतीने तयार होते (जवळ जवळ ४ महिने लागतात)
२
घाण वास, माशा, डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक नाही
घाण वास, माशा, डास यांपासून
उपद्रव संभवतो
३
जागा कमी लागते
जागा जास्त लागते
४
४ x १ x ७५ फूटआकाराच्या गादीवाफया पासून ( म्हणजेच ३०० घनफूट ) दर पंधरा दिवसाला ३ टन खत मिळते
३ x १० x १० फूट आकाराच्याखड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते.
५
उर्जा, गांडूळखत, द्रवरुप खत
कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत.
६
हेक्टरी मात्रा ५ टन लागते
हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते
७
तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते.
तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते.
८
नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के
नत्र उपलब ०.५ ते १.५ टक्के
९
स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के
स्फूरद उपलब्ध ०.५ ते ०.९टक्के
१०
पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के
पालाश उपलब्ध १.२ ते १.४ टक्के
११
सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्धहोतात
सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात
१२
गांडूळे विक्री करुन अतिरिक्त उत्पन्न मिळते
कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही.
Comments