एक सुंदर वृक्ष म्हणून बहाव्याची सर्वत्र ख्याती आहे.
शास्त्रीय नाव: Cassia fistula L.
कुळ: Caesalpinaceae
मराठी नाव: बहावा, कर्णिकार.
वर्णन बहाव्याचा वृक्ष साधारण ८ ते १० मी. पर्यंत उंच वाढतो.
पाने संयुक्तपर्णी समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.
बहाव्याच्या, अंगुराच्या झुपक्यासारख्या दिसणार्‍या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो.
बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.
फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.
उपयोग:
1.कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.
2.बहाव्याची साल कातडे कमावण्याच्या उपयोगी आहे.
3.शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.

Comments

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया