गुढीपाडवा, कडुनिंब वाढवा प्रकाश ठोसरे, अरविंद आपटे
कडुनिंबाच्या अर्कामुळे कीटकांच्या अंडी, अळी, कोष अशा विविध अवस्थांच्या वाढीस वेगवेगळ्या प्रकारे अडथळे निर्माण होतात, त्यांचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कडुनिंबाचा वापरास मोठ्या प्रमाणावर वाव आहे.
कडुनिंब (Azadirachta indica) या वृक्षाचे मूळ स्थान भारतीय उपखंड, ब्रह्मदेश आहे. महोगनी कुळातील हा वृक्ष १५-२० मी., क्वचितप्रसंगी ३५-४० मी. उंच वाढतो. जवळपास वर्षभर हरित राहणारा वृक्ष चांगलाच काटक आहे. कडुनिंब जवळपास सर्व प्रकारच्या माती प्रकारात वाढू शकतो. चांगली निचरा होणारी वालुकामय जमीन जास्त मानवते. राजस्थान, विदर्भासारख्या कडक उन्हाळ्याच्या प्रदेशात ४५ ते ४७ अंश तापमानही तो सहन करू शकतो. वऱ्हाडात महत्त्वाच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात हे वृक्ष दिमाखाने उभे असून, ते कडक उन्हाळ्यातही वाटसरूंना शीतलता देतात; मात्र चार अंश सेल्सिअसखालचे तापमान त्याला मानवत नाही. थंडी, धुक्यामुळे मोठाले वृक्षही करपून जातात.
बहुपयोगी वृक्ष
कडुनिंब हा वृक्ष "दैवी वृक्ष,' "रोगनिवारक,' "निसर्गाचा दवाखाना,' "खेड्यातला दवाखाना' समजला जातो. चरक आणि सुश्रुत या शल्य विशारदांनी याचे औषधी व पथ्यासंबंधी महत्त्व जाणले होते. पद्मपुराणामध्ये दीर्घायू देणारा वृक्ष म्हणून त्याची ओळख आहे. बृहत् संहितेमध्ये हा वृक्ष बागेत किंवा घरात लावला असता, कुटुंबास कल्याणकारी ठरतो, असे नमूद केले आहे. फक्त आयुर्वेदातच नव्हे तर युनानी औषधोपचार पद्धतीतही कडुनिंबाचा वापर केला जातो. कडुनिंबाची पाने, फुले, बिया, साल, गोंद असे सर्वच भाग औषधी आहेत. कफ/ पित्तदोषनिवारक, त्वचारोग, संधिवात, मूळव्याध, मूत्रदोष, कृमिनाशक, कुष्ठरोग (युनानी), सौंदर्यप्रसाधन असे याचे अनेक उपयोग आहेत.
कडुनिंबाच्या वृक्षाचा उपयोग फक्त मानवी स्वास्थ्यापुरताच सीमित नाही, तर कीटकनाशक म्हणूनही त्याचे फार महत्त्व आहे. आपल्याकडे साठवणीच्या धान्यात कडुनिंबाची पाने घालून ठेवण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. डी.डी.टी.सारख्या जहाल रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे कडुनिंबासारखी नैसर्गिक सेंद्रिय कीटकनाशके मागे पडली. कडुनिंबावरील संशोधनाअंती असे आढळून आले आहे, की कडुनिंबाच्या पाने व बियांतील गुणधर्मामुळे जवळपास २०० प्रकारच्या किडींचा उपद्रव नियंत्रणात आणला जाऊ शकतो.

पेट्रोलजन्य इंधनांच्या घटत जाणाऱ्या साठ्यामुळे एकविसाव्या शतकात पेट्रोल/ डिझेलकरिता पर्यायी इंधन शोधण्याची मोहीम सर्वत्र जोरात सुरू आहे. जैवइंधनासाठी आता जट्रोफा, करंजाच्या जोडीने कडुनिंब तेलाचाही पर्याय विचारात घेतला जात आहे. या बहुगुणी कडुनिंबाची जोपासना व्हावी यादृष्टीने भारतीय संस्कृतीने त्याची सांगड धार्मिक भावनांशी घातलेली आहे. नक्षत्रवृक्ष या संकल्पनेत मीन राशीच्या व्यक्तींकरिता कडुनिंबाला आराध्यवृक्ष मानले गेले आहे. आराध्य वृक्षामागचा दृष्टिकोन हा वृक्षांचे संवर्धन व्हावे हाच आहे. गुढीपाडव्याला गुढी उभारताना कडुनिंबाच्या पाने/ मोहराचा होणारा वापर, उन्हाचा प्रकोप कमी करण्यासाठी कडुनिंबाच्या पानाची चटणी खाणे या गोष्टी निंबाच्या औषधी गुणधर्मावर प्रकाश टाकतात. या प्रथेमागे कडुनिंब संवर्धनाचे महत्त्व लोकांनी जाणून घ्यावे हाच उद्देश दिसतो. तेव्हा या गुढीपाडव्याला गुढीसोबत कडुनिंबाची निव्वळ पाने न लावता कडुनिंबाच्या बालतरूची पूजा करून नंतर पावसाळ्यात त्याची योग्य त्या ठिकाणी लागवड केल्यास प्रथेसोबतच आपल्या पूर्वजांच्या उद्देशाचे पालनही होईल.
संपर्क - (०२०) २६१२६३२४
(श्री. ठोसरे हे सामाजिक वनीकरण विभागात संचालक आणि श्री. आपटे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.)
आजमितीस राज्यभरातील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमध्ये पाच लाख रोपे अल्पदरात उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने रोपे विक्री करण्यासाठी राज्यात जवळपास ३०० विशेष स्टॉल्स लावले जाणार आहेत. तेव्हा आपल्या तालुक्याच्या/ जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाशी संपर्क साधून आपण ही रोपे मिळवावीत. आजकाल भारतीय संस्कृतीत नसणारे "डेज' आपण उत्साहाने व कौतुकाने साजरे करतो, तर मग यंदापासून गुढीपाडवा "नीम डे' अशा अभिनव पद्धतीने साजरा करू या. आजपासून सर्वांनी संकल्प करा, की गुलमोहोर, पेल्ट्रोफोरम, काशीद, जॅकरंडासारखी नाजूक व भरभर वाढणाऱ्या झाडांऐवजी बहुपयोगी कडुनिंबाची लागवड गावागावांत रस्त्यांच्याकडेने झाली पाहिजे.

Comments