पाणी बचतीचे सिरसी मॉडेल
पाणी बचतीचे सिरसी मॉडेल
महाराष्ट्रातील अनेक गावांम

ध्ये पाण्याची समस्या नेहमी उद्भवते. ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये ही समस्या नसते, त्यांना अशा गावांमधील लोकांचे दुःख उमगत नाही. अशा गावांमध्ये बरेच वेळा, "आमच्या गावचं काय सांगू? पानी लई लांबधरनं आणाया लागतंय बगा, सरकार काही ध्यानच देत नाही. गावात सतत दुष्काळ पडतोय; पण ऐकायलाच कुणी नाही. गुरं तडफडून मरत्यात. प्यायला पाणी मिळणंही मुश्कील, सरकार काही करत नाही, काय करायचं आम्ही?' असे संवाद हमखास ऐकायला मिळतात.
पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे पाणीच नसेल तर एखाद्या गावाची काय दशा होते, हे उन्हाळ्यात दिसतेच. याउलट काही ठिकाणी निसर्गतःच पाणी जास्त असते; पण त्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेच माहीत नसते. एखादा भाग दुष्काळी असतो; पण जेवढा पाऊस तिथे पडतो, त्याचे पाणी कसे साठवायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण लोकांना नसते. बरेचदा पावसाचे पाणी वाहून जातानाच दिसते. पाण्याचे नियोजन, जलसाक्षरता याबाबत मोठ्या माणसांना जागरूक करायला पाहिजेच; पण लहान मुलांनाही जलसाक्षर केले तर त्यांना पाणी कसे वापरावे, याचे वळण लागेल. म्हणूनच असा एक अनोखा प्रयोग केला आहे, शिवानंद कळवे यांनी कर्नाटकातील सिरसी या गवात.
शिवानंद कळवे हे पत्रकार आणि हाडाचे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांनी सिरसी इथल्या एका शाळेत जलसाक्षरतेचा प्रयोग सुरू केला. त्यांचे हे काम अतिशय नियोजनबद्ध आणि उत्तम आहे. या कामासाठी त्यांनी सिरसी या गावातील शाळा निवडली. सध्या हे गाव चर्चेत आले आहे ते त्यापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्नल्ली माध्यमिक शिक्षणालय या शाळेमुळे.
विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रम शिकवून ही शाळा थांबत नाही, तर विद्यार्थी आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांना जलसाक्षरतेचे धडे अतिशय उत्तम पद्धतीने देण्याचे कामही ही शाळा करते आहे. चांगल्या गोष्टींची सवय आधी लहान मुलांना लावली, तर मोठ्या माणसांनाही लागते, यावर कळवे यांचा विश्वास आहे. कळवे या विषयावर गेली सहा वर्षे काम करत आहेत.
त्यांनी पाणी आणि जंगल यांच्या नात्यासंदर्भात अभ्यास केला आहे. स्लाइड शोच्या माध्यमातून कन्नड परिसरात गावागावांतून जलसाक्षरतेचा प्रयोग केला आहे. त्यांचा या शाळेतला प्रयोग मोठा कल्पक मानावा लागेल. या अनोख्या प्रयोगाच्या माध्यमातून इथल्या मुलांना नुसतेच समाजसेवेचे, पाणी वापराचे दाखले न देता खरेखुरे काम कसे उभे करता येईल, हे प्रत्यक्ष दाखवले जाते. या शाळेच्या आवारात जलविद्युत, जलसंवर्धनाची अठ्ठावीस मॉडेल्स तयार केली आहेत.
विहीर पुनर्भरण, कूपनलिका पुनर्भरण, टेकड्यांच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास, घराच्या छपरावरचं पाणी कूपनलिका किंवा विहिरीत सोडून त्यांचे पुनर्भरण, बांध-बंदिस्ती याद्वारे पाण्याची साठवण, पाणी कसे वापरावे याचे प्रशिक्षण, पावसाचे पडलेले पाणी कसे मोजायचे या आणि अशा अनेक गोष्टी शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवल्या जातात. घरात पाण्याची काटकसर कशी करायची, याचे धडे त्यांना दिले जातात.
मुलांच्या माध्यमातून हे शिक्षण अर्थातच अनेक कुटुंबांपर्यंत जाते आणि त्याची घराघरांतून अंमलबजावणीही होते. या शाळेतील मुले घरात गेल्यावर पालकांना पाणी वापराचे धडे देतात. इतकेच नव्हे, तर या शाळेत इतर चांगले प्रयोगही उभे राहत आहेत. या शाळेच्या परिसरात पाच एकर जागेवर पर्जन्यकेंद्र उभे केले आहे. पर्जन्यकेंद्राचे शिवानंद मूर्थी हे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पाणी वापराचे धडे देतात. आता या प्रयोगात सिरसीमधले ग्रामपंचायत सदस्यही सहभागी झाले आहेत. तिथल्या वनविभागाचे व कॅनरा डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सहकार्यही त्यांना लाभले आहे.
इथे केवळ विद्यार्थी आणि शिक्षक यां?ाच जलसाक्षरतेचे धडे दिले जात नाहीत, तर शाळेला भेट देण्यास येणाऱ्या लोकांनाही दिले जातात. हे मॉडेल पाहायला लांबलांबून लोक येतात. पाणी वापराबाबत ग्रामीण आणि शहरी भागांत मोठी दरी आहे, त्याचप्रमाणे वादही आहेत; पण दोन्हीकडे राहणारे नागरिक याबाबत आपले कर्तव्य काय, याचा विचार करताना दिसत नाहीत. सिरसीचा प्रयोग पाहून मात्र त्यांची दृष्टी निश्चितच सकारात्मक होईल

Vrukshayan,A Movement of Plantation
C/20 Shivshakti CHS,
Near Mayur colony,
Kothrud Pune 411038
http://vrukshayan.blogspot.com/
@Gireesh-9850214645
@Sachin-9822553487
@Vikram-9881063280
Comments