पाणी बचतीचे सिरसी मॉडेल महाराष्ट्रातील अनेक गावांम ध्ये पाण्याची समस्या नेहमी उद्भवते. ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये ही समस्या नसते, त्यांना अशा गावांमधील लोकांचे दुःख उमगत नाही. अशा गावांमध्ये बरेच वेळा, "आमच्या गावचं काय सांगू? पानी लई लांबधरनं आणाया लागतंय बगा, सरकार काही ध्यानच देत नाही. गावात सतत दुष्काळ पडतोय; पण ऐकायलाच कुणी नाही. गुरं तडफडून मरत्यात. प्यायला पाणी मिळणंही मुश्कील, सरकार काही करत नाही, काय करायचं आम्ही?' असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे पाणीच नसेल तर एखाद्या गावाची काय दशा होते, हे उन्हाळ्यात दिसतेच. याउलट काही ठिकाणी निसर्गतःच पाणी जास्त असते; पण त्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेच माहीत नसते. एखादा भाग दुष्काळी असतो; पण जेवढा पाऊस तिथे पडतो, त्याचे पाणी कसे साठवायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण लोकांना नसते. बरेचदा पावसाचे पाणी वाहून जातानाच दिसते. पाण्याचे नियोजन, जलसाक्षरता याबाबत मोठ्या माणसांना जागरूक करायला पाहिजेच; पण लहान मुलांनाही जलसाक्षर केले तर त्यांना पाणी कसे वापरावे, याचे वळण लागेल. म्हणूनच असा एक अनोखा प्रयो...