सामजिक शहरी, निमशहरी वनीकरण

सामजिक वनीकरण...थोडक्यात माहिती...

"सामजिक शहरी, निमशहरी वनीकरण" हा एक कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे.

जसे नेहमी होते " शहराबाहेर एक दिवस जाउन वॄक्षारोपण होते....अन नंतर त्या कडे कोणीही लक्ष्य ही देत नाही...."
हा कार्यक्रम "एक दिवस" च्या वनविहारापेक्षा काही विशेष नसतो..... आणि काही दिवसातच... ती लावलेली रोपे जगलीत की मेलीत हे कोणीही बघत नाहीत........दर वर्षी त्याच जागी....वॄक्षारोपण होते....

हेच टाळण्यासाठी....अतिशय वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम आपल्याला जास्तीत- जास्त लोकापर्यंत न्यायचा आहे.....

साधारण "५०० परिवारांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेउया"
ह्या मध्ये आपले मित्र, नातेवाईक, शेजारी....ओळखीचे..... असे सगळे असतील....

सकल जनांना... "आवाहनात्मक पत्र" पाठविण्याचे ठरवयचे....
साधारण १ जानेवारी पासून १ वर्षाकरीता त्यांना २,३ रोपे संवर्धन करीता घेण्यासाठी निवेदन करायाचे!
आवाहन पत्रासोबत - प्रत्युत्तराकरीता आपले "Businees reply Card -Post Card", Email-id ,Mobile No इ. पाठवायाचे.
"जे संपर्क करतील त्यांना भेटुन रोपे द्यायची"

ईतरांना १ आठवड्या नंतर परत एक आवाहन पत्र पाठवायाचे. आणि नंतर प्रत्यक्ष भेटुन आवाहन करायाचे.
ही रोपे मोफ़त द्यायची, त्याच बरोबर त्यांचे संगोपन नीट करण्याची हमी घ्य़ायची.....
(ही रोपे सरकारी रोपवाटिका/ प्रायोजक.(with advertisement- ref. रमेश डाईंग...) आणि गरज पडली तर थोडी वर्गणी.. ह्या रीतीने उपलब्ध करुया.)
आपण स्वतः हया १ वर्ष भरात वेळोवेळी...ह्या"वॄक्षमित्रां"ना संगोपनाकरीता मदत करायची....

ही रोपे १ वर्षानंतर शहरी, निमशहरी अश्या भागात रोपण करायाची. हे नागरीक स्वत:ही रोपण करु शकतील.
तसेच ह्या"वॄक्षमित्रां"ना सदर वॄक्षाकरीता "नाव" देण्याची विनंती करायची. हे नाव अगदी वॄक्षमित्रांचे नातेवाईक,आवडते लेखक,पुस्तक,अभिनेता,Picture असे काही असु शकेल...

ही रोपे नीम (कदुनिंब), आवळा, बहावा, गुलमोहर, किंवा सफ़ेद बाभूळ, (tulip polar), असे FAST GROWNING TREES ( 5 to 7 feet growth/year) अशी असतील.

ह्या Dev 08 मध्ये सकल जनांना... "आवाहनात्मक पत्र" पाठविण्याचे (नववर्ष्याचा संकल्प) करा ई!
ईतरांना १ आठवड्या नंतर परत एक आवाहन पत्र पाठवायाचे. आणि नंतर प्रत्यक्ष भेटुन आवाहन करायाचे


ह्या कार्यक्रमाचे आणखी एक फ़ायदा असाही होईल की ५०० परिवार एका धाग्याने जोडले जातील
आणि जे असे अनेक "लोक सहभागाचे" कार्यक्रम आपल्याला करीता येतील......

Comments

Popular posts from this blog

गांडुळ खत -प्रक्रिया