कथा आणि व्यथा..
शहरीकरण औद्योगिकीकरण करताना मोठे मोठे बदल झाले, आणि होत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे मोठ-मोठया वृक्ष्यावरही गंडांतर आले.
मोठयाप्रमाणावर वृक्ष्यतोड झाली, शहरे उजाड ,भकास झाली,होत आहेत. पुणे शहरामध्ये फ़र्ग्युसन रस्ता, सिंहगड रस्ता, अशी अनेक उदाहरणे आहेत.
ह्याला पायबंद घालणे शक्य नाहीये.
ठराविक परिसर सोडला "सामाजिक वनीकरण" कार्यक्रम अपयशी ठरला आहे, हे सर्वश्रुतच आहे.
आपण निसर्गाचीच लेकरे, निसर्गाच्या कुशीत, सानिध्यात आप्अले खरे सुख: दडलेय.
रानाचा हिरवा रंग,मृदगंध, निरव शांतता,मोकळी शितल हवा आपल्यावर भुरळ पाडते, मन मोहविते.
निसर्गाच्या ओढ आपल्याला भुलविते, नारळीच्या पोफ़ळीच्या बागा घनदाट झाडी मनप्रसन्न करते.
पारिजातकाचा स्वर्गीय सुगंध कोणत्या अत्तरामध्ये सापडेल?
पक्ष्यांची किलबिल, कुजरव कोणत्या केसेटमध्ये सापडेल?
निसर्गाचे बहुरंगी उधळ्ण कोणत्या चित्रात पकडता येईल?
एखाद्या वृक्ष्याची शितलता पंख्यातून किंवा A/C मध्ये मिळेल?
निसर्गाच्या नाशाकडे जाणारी घसरण थांबविणे जरी अवघड असले,तरी निसर्ग संवर्धन आपण नक्की करू शकतो.
निसर्गाच्या संरक्षणाईतकी किंबहुना त्यापेक्षाही निसर्ग संवर्धनाची निकड जास्त आहे!
काळ कदाचीत आपल्याला भानावर आणेलही, पण तोपर्यंत थांबायाचे का? वेळ जाण्याआधिच जागृत होऊया!
उत्तर आणि उपाय...
"एक सामान्य माणुस काय करणार?" ह प्रश्न आपल्याला पडतो....
... पण अशी अनेक सामान्य माणसे एकत्र आली तर कोणतीही किमया करु शकतात!
स्वत:च्या गरजांचे जसे आपण नियोजन करतो त्याप्रमाणे भूमी, पाणी, हवा आणि वनस्पती यांचे ही नियोजन संवर्धन आणि संगोपन करणेही गरजेचे आहे!
"सार्वजनिक (शहरी, निमशहरी) वृक्षारोपण वनीकरण" हा एक कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे.
वनीकरण म्हणजे आतापर्यंत जसे होत होते की " एक दिवस शहराबाहेर जाउन वॄक्षारोपण होते, अन नंतर त्या कडे कोणीही लक्ष्य ही देत नाही...."
असे कार्यक्रम म्हणजॆ "एक दिवस" वनविहार,. त्यापेक्ष्या काही विशेष नसते..... आणि काही दिवसातच... ती लावलेली रोपे जगलीत की मेलीत हे बघायालाही कोणी जात नाहीत. सदर कार्यक्रम दर वर्षी होत असतात पण प्रत्येक वर्षी त्याच जागी वॄक्षारोपण होते.
खरेतर अशी लहान रोपे थेट जमिनीवर लावल्यावर शक्यतो जगत नाहीत.
हयाच चुका टाळण्यासाठी....अतिशय वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम आपण हाती घेत आहोत....
चला वृक्षायनला साथ देऊया, उद्यासाठी आजपासूनच सज्ज होऊया!
वृक्षायन आपल्याला आवाहन करते आहे की," एकावर्षाकरीता एक रोप दत्तक घ्या, त्याचे संगोपन करा"
हे रोप पुर्णता: मोफ़त मिळेल, पण संगोपनची हमी मात्र तुमची असेल.
आपण सुचवाल तसे ह्या वृक्षाचे नामकरण करुन,वॄक्षारोपण करताना तसा फलकही लावण्यात येईल!
एकावर्षानंतर वृक्षायन समावेत आपल्या ह्या रोपाचे आपल्या हस्तेच चौका-चौकात/ रस्त्याच्या बाजुला वॄक्षारोपण करण्यात येईल.
वृक्षसंगोपनाच्या मदतीकरीता वृक्षमित्र खते,इत्यादी साठी महिन्यातून एकदा आपली भेट घेईल.
Comments