तापमानवाढ नियंत्रणासाठी वनसंवर्धन - !चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र बनूया!
जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणण्यात वनांचा फार मोठा सहभाग आहे. लोकसंख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वातावरणात जास्त प्रमाणात निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्साइड हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीला या महान समस्येपासून वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. आधुनिकीकरण व औद्योगीकरण यांचा वेग वाढत असून विश्वातील पर्यावरणात प्रदूषणाची बेसुमार वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, त्यातच माणूस जंगलाची बेसुमार तोड करीत आहे. त्यामुळे आज असंख्य समस्यांनी जगाला ग्रासलं आहे. अशा समस्यांपैकी प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) ही सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. वनांच्या तोडीमुळे जागतिक तापमानवाढ कशी होत आहे, याबाबतची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. "ग्लोबल वॉर्मिंग" या महान समस्येपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र होऊया.... जागतिक ता...