Posts

Showing posts from April, 2017
झाडं लावा...भरपूर झाडं लावा ! (एकनाथ कुंभार) ज्यांना ज्यांना शक्‍य आहे , त्यांनी त्यांनी भरपूर झाडं लावायला हवीत. आपण जितकी जास्त झाडं लावू , तितकी ती कमीच ठरतील! पर्यावरणाच्या रक्षणासाठी , वायुप्रदूषण रोखण्यासाठी , आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी , पाऊसमान वाढवण्यासाठी ‘ झाडं लावणं ’ याला पर्याय नाही. आजच्या (पाच जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झाडांची महती सांगणारा हा लेख. - एकनाथ कुंभार रविवार , 5 जून 2016 - 01:15 AM IST http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Y8FZEP वृक्षतोडीनं ढग गेले...ढगाविना पाऊस गेला...पावसाविना समृद्धी गेली... इतके अनर्थ वृक्षतोडीनं केले! दुष्काळ , पाणीटंचाई याची झळ आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच जाणवत आहे. झाडं लावणं , झाडं जगवणं याला कोणताही पर्याय नाही , याची जाणीव जवळपास प्रत्येकालाच आता होऊ लागली आहे ; पण या जाणिवेला प्रत्यक्ष कृतीची आणि इच्छाशक्तीची जोड हवी. या वर्षी पाऊस भरपूर होणार , असं भाकीत वेधशाळेनं वर्तवलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येक घटकानं वृक्षलागवडीसाठी पेटून उठलं पाहिजे! १९९६ मध्ये राज्य शासनानं अधिसूचना काढली होती , की प्रत्...