Posts

Showing posts from May, 2011

गांडुळ खत -प्रक्रिया

Image
गांडुळ खत - गांडुळ जीवनक्रम - गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका ...

गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक

गांडूळखत व कंपोस्ट  /  शेणखत यातील   फरक अ.क्र. गांडूळखत शेणखत  /  कंपोस्ट खत १ गांडूळखत लवकर तयार होते  ( गांडूळे गादी वाफयावर स्थिरावल्यावर २-३ आठवडे) मंदगतीने तयार होते  ( जवळ जवळ ४ महिने लागतात ) २ घाण वास ,  माशा ,  डास यांचा उपद्रव नसून आरोग्याला अपायकारक   नाही घाण वास ,  माशा ,  डास   यांपासून   उपद्रव संभवतो ३ जागा कमी लागते जागा जास्त लागते ४ ४   x  १   x  ७५ फूटआकाराच्या गादीवाफया पासून  (  म्हणजेच ३०० घनफूट  )  दर पंधरा दिवसाला ३ टन खत   मिळते ३   x   १०   x   १० फूट आकाराच्या खड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते. ५ उर्जा ,  गांडूळखत ,  द्रवरुप खत कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत. ६ हेक्टरी मात्रा ५ टन लागते हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते ७ तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य   जोमात होते. तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद   असते. ८ नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के नत्र उपलब ०.५ ते १.५ टक्के...