Posts

Showing posts from November, 2011
Drip irrigation was invented in Israel in 1959 as a way of using more efficiently the scarce resource. Since then, Israeli farmers have refined and automated the process, linking data on temperature, radiation, humidity and soil-water content to not only control where water is released, but when, and how much is needed to meet a plant’s need for transpiration.

जागृत, प्रगत इस्राईल

Image
राजू इनामदार , रविवार २९ मे २०११ rajuinamdar30@yahoo.co.in इस्राईल म्हटले की आपल्याला प्रथम आठवते ती त्यांची जगप्रसिद्ध गुप्तहेर संघटना, मोसाद! मग त्यांची लष्करी सज्जता, प्रत्येक नागरिकाला असलेली लष्करी प्रशिक्षणाची सक्ती, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा छळ करणाऱ्या जर्मनीतील लष्करी अधिकाऱ्यांना युद्धानंतर जगभरातून शोधून काढून आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आणण्याची इस्राईलची विजिगीषू वृत्ती.. बहुतेकांच्या सांगण्यात इस्राईल म्हणजे असाच युद्धाशी किंवा त्यासंबंधीच्या विविध कथांशी जोडला गेलेला देश असतो! मात्र या सगळ्याच्या पलीकडेही त्या देशात आणखी काहीतरी आहे. त्यांच्या वाणिज्य मंत्रालयाने इस्राईलची राजधानी तेल अवीव येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेनिमित्ताने हे ‘आणखी काहीतरी’ काय आहे ते दिसले. इस्राईल काय आहे ते या पाच दिवसांच्या दौऱ्यात फार खोलात जाऊन शोधता नाही आले, तरी वरवर का होईना, पाहता आले. प्रत्येक इस्राइलीने त्याचे वैयक्तिक आयुष्य आपल्या देशाबरोबर जोडले आहे. इस्राईलच्या सगळ्या प्रगतीचे रहस्य त्यात आहे, असे या काही दिवसांच्या भेटीतही अगदी स्पष्टपणे जाणवले. इस्राईलच्या ...